जिल्ह्यात कोरोना संसर्ग थांबेना ! आज १७० रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात 170 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामध्ये जळगाव शहर २३, जळगाव ग्रामीण ०५, भुसावळ ०८, चाळीसगाव ०२,एरंडोल २०, पाचोरा ०४, यावल १४, अमळनेर १५, धरणगाव १२, रावेर ०७ असे एकूण १७० बाधित आढळले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 3438 झाली आहे.

दरम्यान , आज १०१ रुग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २०१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर जिल्ह्यात आज ०९ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत २३४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.