ट्रायल ऑफ प्लाझ्माथेरपी  करिता रेडक्रॉस रक्तपेढी येथे प्लाझ्मा फेरेसिसचा शुभारंभ

0
जळगाव :- इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढी मध्ये प्लाझ्मा फेरेसिस ला प्रारंभ करण्यात आला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटल रक्तपेढिमध्ये ऑन लाईन व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे  उद्घाटन केले !
रेडक्रॉस भवन येथील सभागृहात ऑन लाईन व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे  उद्घाटन सोहळ्यास जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार श्री. गुलाबरावजी पाटील – रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत  राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जप्रकाश रामानंद – एम.डी. (औषध शास्त्र),  प्रा. डॉ. विजय गायकवाड,  प्रा.डॉ. भारत . घोडके तसेच शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. उमेश कोल्हे  तसेच रेडक्रॉसचे पदाधिकारी – उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव – विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन – डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी – एम.डी. (पॅथॉलॉजी), राजेश यावलकर – सह सचिव, अनिल कांकरीया – रक्तपेढी सचिव, सुभाष सांखला – चेअरमन – आपत्ती व्यवस्थापन समिती, डॉ. अपर्णा मकासरे एम.डी.  (होमिओपॅथी) प्रकल्प प्रमुख (आर्सेनिक अल्बम – ३०), सौ. पुष्पाताई भंडारी, डॉ. विजय चौधरी – कार्यकारिणी सदस्य, प्लाझ्माफेरेसीसचे दाते, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मिलिंद बुवा,  रेडक्रॉसचे रक्तसंक्रमण अधिकारी, प्रशासकीय अधिकारी
– लक्ष्मण तिवारी व जन संपर्क अधिकारी – स्वप्नील  वाघ  उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात जळगांव रेडक्रॉस सोसायटी च्या रक्तपेढीचा उल्लेख करत कौतुक करून अभिनंदन केले.
रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी  तसेच रक्त संक्रमण अधिकारी, डॉ. अनिल चौधरी,  डॉ. अरविंद चौधरी, डॉ. एस.बी. सोनवणे, पर्यवेक्षकीय तंत्रज्ञ टी.आर. जोशी, अनिल भोळे व शासकीय रुग्णालय रक्तपेढिचे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. रोहिणी देवकर,  प्लाझ्मा फेरेसिस प्रसंगी उपस्थित होते.
 कोरोना मुक्त झालेल्या व्यक्ती द्वारे संकलित  झालेल्या प्लाझ्मा  व्दारे जे रुग्ण कोरोना बाधित असून गंभीर अवस्थेत आहे त्यांच्यावर प्लाझ्मा देऊन उपचार केले जाणार आहे.  याची सुरुवात दिल्ली सरकारने केली असून गंभीर स्वरूपातील कोरोना बाधित रूग्ण आजारातून बरे होत आहेत.  महाराष्ट्रात प्लाझ्मा फेरेसिस ची ट्रायल घेण्यास सुरुवात करण्यात आली.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगाव संचलित रक्तपेढीत टेरुमो पेनपॉल कंपनीची ट्रिमा मशीन कार्यरत असून सी.डी.एस.सी.ओ. मुंबई व अन्न व औषध प्रशासन  नाशिक यांनी प्लाझ्मा फेरेसिस एक अतिरिक्त उत्पादन निर्मितीसाठी मान्यता  दिली आहे.  या कामी अन्न व औषध प्रशासन, आयुक्त भामरे, जळगावचे सहायक आयुक्त . जाधव, वरिष्ठ निरीक्षक  मनोज अय्या व कौतीकवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जळगाव आणि रेडक्रॉस रक्तपेढीसमवेत सामंजस्य करारावर सह्या झालेल्या आहेत.
या सामंजस्य करारानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जळगाव व रेडक्रॉस रक्तपेढी जळगाव यांच्या सयुंक्त विद्यमानाने संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनानुसार  संस्थेचे पदाधिकारी गनी मेमन – उपाध्यक्ष, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, मानद सचिव – विनोद बियाणी, रक्तपेढी सचिव – अनिल कांकरिया,  सह सचिव -राजेश यावलकर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद – एम.डी. (औषध शास्त्र), डॉ.विजय गायकवाड प्रा.डॉ. घोडके व प्रा. तसेच शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. उमेश कोल्हे यांचेसमवेत गेल्या पंधरा दिवसापासून या विषयावर अभ्यास व चर्चा सुरु होती.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे व बाधित रुग्ण आहेत त्यावर प्रभावी उपचार करण्याच्या दृष्टीकोनातून प्लाझ्माफेरेसीस थेरपी हे रामबाण सिद्ध होईल व रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात उल्लेखनीय वाढ होईल अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
सुरवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि अधिष्ठाता डॉ. जप्रकाश रामानंद यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रस्तविकात डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी प्लाझ्म कोण देऊ शकतो पद्धत आणि त्याचे फायदे विशद केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघ दात्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्तींनी स्वतः हुन पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना आवाहन केले.
 जळगाव शहरात रेडक्रॉस रक्तपेढी मुळे प्लाझ्मा फेरेसिस आपण करू शकत असल्याने उपस्थित सर्व मान्यवरांनी रेडक्रॉसच्या संचालकांचे अभिनंदन केले

Leave A Reply

Your email address will not be published.