Breaking : राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्ह्णान ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. त्यानंतर ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

राज्यातील कंटोनमेंट झोन क्षेत्रात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, 31 जुलैपर्यंत हा लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. मात्र, मिशन बिगेन अगेन १ मध्ये नागरिकांना जी सवलत देण्यात आली होती, ती या लॉकडाऊनमध्येही कायम असणार आहे. तर, मिशन बिगेन अगेन २ मध्ये हळू हळू इतरही सेवा सुरळीत करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. मात्र, शासनाचा आदेश येईपर्यंत हा लॉकडाऊन आणि शिथिलता देण्यात आलेल्या आस्थपनाच सुरु राहणार आहेत. नवीन सवलतींबाबत शासनाकडून वेळोवेळी माहिती देण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.