जळगावात पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

0

जळगाव (प्रतिनिधी) । देशात रोज होत असलेल्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सोमवारी जळगाव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेतर्फे अभिनव आंदोलन करण्यात आले. यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे ‘मृत पावलेल्या वाहनांना’ श्रद्धांजली अर्पीत करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

जळगाव जिल्हा एन.एस.यु.आय.च्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देत केंद्र सरकारकडे मागणी केली की, पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी व जनतेला दिलासा द्यावा अन्यथा एन.एस.यु.आय.च्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी भविष्यात आक्रमक पवित्रा हाती घेण्याचा इशाराही देण्यात आला.

पेट्रोल डिझेल, ईंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज काँग्रेस भवन येथे जळगाव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली शहर उपाध्यक्ष शाम तायडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल, ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, रेशन कमिटीचे अध्यक्ष वासुदेव महाजन, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अनु.जाती-जमाती अध्यक्ष मनोज सोनवणे, जमी शहराध्यक्ष प्रदीप सोनवणे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद पठाण, उद्धव वाणी, दिपक सोनवणे, मनोज चौधरी, जाकीर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी दुचाकीवर कफन टाकून श्राद्ध करून उपरोधिक आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.