बँकेच्या चेअरमनपदी प्रदीप अग्रवाल, व्हाईस चेअरमन पदी दीपक साळी

0

अमळनेर (प्रतिनिधी):-येथील अर्बन बँकेच्या चेअरमन पदी प्रदीप अग्रवाल तर व्हाईस चेअरमन पदी दीपक साळी यांची आज बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील होते. त्यांना सहकार विभागाचे सुनील महाजन व व बँकेचे व्यवस्थापक अमृतराव पाटील यांनी सहकार्य केले.

यावेळी मावळते चेअरमन पंकज मुंदडे, संचालक प्रवीण जैन, भरतकुमार ललवाणी, अभिषेक पाटील, लालचंद सैनानी, पंडित चौधरी, शांताराम ठाकूर, मोहन सातपुते ,वसुंधरा लांडगे, मिराबाई निकम उपस्थित होते. संचालकांतर्फे पंडित चौधरी तर उपस्थितांतर्फे माजी चेअरमन कुंदनलाल अग्रवाल यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सभेचे सर्व कामकाज सोशल डिस्टन्स ठेवून करण्यात आले. अनेक मान्यवर नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या अभिनंदनाला टप्प्याटप्प्याने व डिस्टंसिंगने येत होते हे विशेष.

Leave A Reply

Your email address will not be published.