लॉकडाऊन काळात डॉ. बाळासाहेब कुमावत यांचे कार्य कौतुकास्पद ; ना.पाटील

0

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना रोगाचा पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत स्व:ताच्या जीवाची पर्वान करता लाॅकडाऊन काळात जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र तर्फे मोफत आरोग्य शिबीर व जिल्हाभरात कोरोना मुक्तीवर आर्सेनिक अल्बम 30 या भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सूचित केलेल्या होमिओपॅथी औषधी चे स्वयंस्फूर्त रित्या 28 हजार नागरिकांपर्यंत पोचविण्यात आल्या होत्या याबद्दल जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाळासाहेब कुमावत व सचिव डॉक्टर प्रितम कुमावत, यांनी महाराष्ट्रराज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांनी माहिती जाणून घेत कौतुक केले यावेळी संस्थेतर्फ जळगाव जिल्हात पाचोरा,भातखंडे, चाळीसगाव, नेरी, पहुर, शेंदुर्णी, गिरड मध्ये घेण्यात असलेल्या विविध उपक्रम तसेच लॉकडाऊन मुळे विविध लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे बहुतांशी लोक ताण-तणावाखाली आलेल्या त्या ताण-तणावातून बाहेर निघण्यासाठी लोकांनी व्यसनाचा सहारा घेतला व ते लोक व्यसना अहारी झालेल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी. जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र तर्फे समुपदेशन सोबत औषधीचे वाटप संस्थेमार्फत करण्यात आले. व येणाऱ्या काही दिवसात एक लाख लोकांपर्यंत या महा शिबिराचा लाभ देण्याचा संकल्प असल्याचे डॉ. बाळासाहेब कुमावत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.