राष्ट्रवादीबद्दलच्या फडणवीसांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शरद पवारांची प्रतिक्रिया ; म्हणाले…

0

सातारा । दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचीच ऑफर होती असं संगत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या त्यांना भरपूर वेळ आहे असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. शरद पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारताना फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर आपली प्रतिक्रया यावेळी दिली.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
राष्ट्रवादी काँग्रेसची दोन वर्षांपूर्वी आमच्यासोबत येण्याची इच्छा होती असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यासंदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या. मात्र भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळी सांगितलं की शिवसेना सोडून हे आपल्याला करता येणार नाही. शिवसेना सोबत राहून जर राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं असेल तर घेऊ असंही तेव्हा ठरलं होतं. चर्चा बऱ्याच पुढे गेल्या होत्या मात्र नंतर ते सगळं प्रकरण थंड बस्त्यात गेलं असं देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.