अखेर बोदवड ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टरांची नियुक्ती

0

बोदवड  (प्रतिनीधी) : शहर तथा तालुक्यातील काही ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केला असून तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३८ वर पोहचली आहे.त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बोदवड तालुका ५२ खेड्यांचा तालुका असून तालुक्यातील सामान्य जनता प्राथमिक उपचार घेण्यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात येत असते.मात्र दुदैव असं की,कोरोना संकटकाळातही येथील रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर नसल्याने परिणामी गेल्या वीस दिवसांपासून येथील ओपीडी बंद अवस्थेत होती.त्यामुळे खेड्यापाड्यातील गोरगरिब जनतेला डॉक्टर नसल्याने ओपीडी बंद असल्याने खाली हात परतावे लागत असे.
गेल्या ५ जून म्हणजे तब्बल २० दिवसापासून येथील रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर नसल्‍याचे उपचार कुठे करावे ?असा पेच नागरिकांना निर्माण होत होता.येथील रुग्णालयात एकुण ३० आरोग्य कर्मचारी आहेत.मात्र एमबीबीएस डॉक्टरच उपलब्ध नसल्याने येथील रुग्णालय डॉक्टर अभावी असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र उशिरा का होईना पण तालुक्यात कोरोना संकट उभे असतांना प्रशासनाकडून येथील रुग्णालयात तात्पुरते का होईल पण बोदवड येथील डॉ.उदयकुमार पाटील,डॉ.आरिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.