पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन

0

जळगाव :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि लघु उद्योग भारती, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पध्दतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांनी रिक्तपदे ऑनलाईन माध्यमाद्वारे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना यामुळे संधी उपलब्ध होणार आहे.
विविध कंपन्यांनी एस. एस. सी, एच. एस. सी, आय. टी. आय मधील विविध ट्रेडधारक आणि डिप्लोमा अशा शैक्षणिक पात्रता धारकांच्या 150 जागा भरावयाच्या आहेत. रोजगाराच्या संधी प्राप्त करून देणाऱ्या कंपनी आणि त्यांच्याकडे ऑनलाईन पध्दतीने मुलाखतींसाठी पत्ता तथा संपर्कक्रमांक अशाप्रकारे आहेत.
1) एसिम श्रीनिसन्स प्रा.लि.चाकण/औरंगाबाद 0240-2335429, भ्रमणध्वनी क्रमांक 7219601108
2) चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणी म.चोपडा भ्र.ध्व.9579045133
3) तिस्या बिल्डींग पोडक्टस प्रा. लि. पुणे- ई-मेल[email protected]
4) युरेका फोर्ब्स, जळगाव-8788579342
5) नवकिसान बायो प्लॅन्टेक लि. जळगाव – 0257-2224897, भ्रमणध्वनी क्रमांक 9348777786 या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उमेदवारांनी उद्योजकांशी 29 जून ते 3 जुलै, 2020 दरम्यान दूरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा ई-मेलद्वारे ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधून रोजगार उपलब्धतेच्या संधीचा फायदा घ्यावा. असे श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक संचालक, कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Leave A Reply

Your email address will not be published.