मान्सून येत्या चार-पाच दिवसात राज्यात पुन्हा कमबॅक करेल

0

पुणे : गेली आठवडाभर दडी मारून बसलेला मान्सून येत्या चार ते पाच दिवसात पुन्हा कमबॅक करेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

मान्सून नियोजित वेळापञकाच्या तब्बल 12 दिवस आधीच संपूर्ण देशभरात पोहोचला असून जूनच्या सरासरीच्या तुलनेत देशात 21 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यातही सरासरीपेक्षा पाऊस पडल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.

खरंतर, यंदा देशावर कोरोनाचं संकट आहे. अशात चक्रीवादळाने अनेक राज्यांचं नुकसान झालं. अजूनही आसमानी संकटाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे मुसळधार पावसाच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल योग्य त्या ठिकाणी साठवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.