पहूर येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह ,संख्या चार

0

पहूर ,ता .जामनेर | ( जयंत जोशी )

पहूर पेठ येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पहूर येथील कोरोना पाॅझीटिव्ह रूग्ण आता चार झाले आहे .
पहूर येथील महिलेस दिनांक १५जून रोजी खोकला व
दमाचा त्रास होत असलेने जामनेर येथील दवाखान्यात घेऊन गेले असता. ऑक्सिजन लेव्हल कमी आल्याने त्यांना जळगांव येथे खाजगी दवाखान्यात न घेतल्याने जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल केले असता कोवीड सेंटर ची परिस्थिती पाहून दि.१५ रोजी कोवीड सेंटर व खाजगी लॅब येथे स्वॅब दिले.
मात्र त्याच दिवशी तब्येत बरी नसल्याने औरंगाबाद येथे हलविले. दि.१६ रोजी औरंगाबाद येथील खाजगी लॅब मध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. तत्पूर्वी जळगावला कोवीड सेंटर येथे दिलेल्या स्वॅब चा अहवाल दि.१७ रोजी निगेटिव्ह आला. दि.१८रोजी औरंगाबाद ला दिलेल्या स्वॅब चा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि जळगांव खाजगी लॅब चा अहवाल आज १९जून रोजी पाॅझीटिव्ह आल्यामुळे जळगांव कोवीड रूग्णालय यंत्रणेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
आता पहूर येथील कोरोना पाॅझीटिव्ह रूग्ण संख्या चार झाली आहे. तर एक रूग्ण बरा झाला आहे. तर तीन उपचार घेत आहे. जर या महिलेस नातेवाईकांनी तात्काळ औरंगाबाद ला हलविले नसते तर कोवीड सेंटर चा अहवाल निगेटिव्ह व खाजगी लॅब जळगांव व औरंगाबाद येथील अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले नसते. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या पद्धतीमुळे महिलेच्या जिवावर बेतले असते. गावकऱ्यांनी आता तरी सावध व्हावे ,असे कळकळीचे आवाहन प्रशासनाने केले आहे

पहूर पेठ येथे ग्रामपंचायती तर्फे निर्जंतुकीकरण फवारणी
पहूर पेठ ग्रामपंचायती तर्फे महिला पाॅझीटिव्ह आढळून आलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे.
नागरीकांनो आता तरी सावध व्हा ! असे कळकळीचे आवाहन प्रशासनाने केले आहे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.