अयोध्या नगर, सुकदेव पाटील नगर कन्टेटमेंट झोन खुला करावा

0

रहेवाशीयांची मागणी ; प्रांताना दिले निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी )- अयोध्या नगर, सुकदेव पाटील नगर या भागातील कोरोना बाधित रुग्णानां बरे होण्याचा  कालावधी पुर्ण झाला आहे मात्र अद्यापही

कन्टेटमेंट झोन खुला करण्यात आला नाही हा कन्टेटमेंट झोन खुला करण्यात यावा याकरीता आज दिनांक १७ जून रोजी परिसरातील रहिवाशांना सोबत घेऊन विशाल ठोके, प्रा.धिरज पाटील, नितीन सराफ, कुशल पाटील, उमेश लोखंडे, लव झाडगे, मंगेश कवी यांनी  भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यलयात निवेदन सादर केले.

अयोध्या नगर, सुकदेव पाटील नगर येथे दिनांक १९ मे २०२० या दिवशी कोरोना रुग्ण आढळून आले होते. हे रुग्ण बरे होऊन घरी आलेले आहे. नियमानुसार सदर कालावधी पुर्ण झाल्यानंतर सुदधा परिसर बंद ठेवण्यात आला आहे.

या भागात १ महिना होऊन सुद्धा नवीन कोरोना रुग्ण सापडलेले नाही. परिसर बंद असल्यामुळे परीसारातील नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे म्हणून अयोध्या नगर, सुकदेव पाटील नगर मधील कन्टेटमेंट झोन खुला करावा अशी मागणी नागरिकांची आहे.

नागरिकांनी परिसरात सोशल डिस्टन्सचे पालन करावे, विनाकारण गर्दी करू नये, जेष्ठांनी घरातच थांबावे अश्या सूचना नागरिकांना विशाल ठोके यांनी केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.