माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन !

0

रावेर | प्रतिनिधी 

रावेर विधानसभा मतदार संघाचे माजी खा.आमदार तथा भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालाय. हरिभाऊ जावळे यांना ३ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला हलविण्यातआले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू आज दुपारी अखेर उपचार घेत असताना त्याची प्राण ज्योत मालवली. दरम्यान, हरिभाऊ जावळे हे दोन वेळेस आमदार तथा दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद देखील भूषवले होते. हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबई उपचार सुरू असताना आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे. हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे. हरिभाऊ यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, हरिभाऊ जावळे यांची मागील वर्षी महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.