लोण पिराचे व वङजी परीसरात तब्बल २१ तासानंतर विज पुरवठा सुरु

0

भडगाव (प्रतिनिधी) : पाचोरा ३३ के.व्ही मेन लाईनचे २ विजेचे पोल भडगाव शहरातील बाळदरस्ता भागात काल सायंकाळी पाऊसात जमिनीवर आडवे पडले होते. त्यामुळे तालुक्यातील वडजी विज उपकेंद्र अंतर्गत गावे तसेच लोण पिराचे विज उपकेंद्र अंतर्गत अनेक गावे राञभर अंधारात बुडाली होती. आज दुपारी ४ वाजता तामसवाङी ता. पारोळा येथुन विज पुरवठा जोडण्यात आला आहे. या सर्व गावांचा विज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. अशी माहीती गोंडगाव विज वितरणचे इंजिनियर एस. एच .दहीवले यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना दिली. तब्बल २१ तासानंतर लोणपिराचे, गोंडगाव, वाडे, बांबरुड प्र. ब. परीसरात ११ गावांचा तसेच वडजी परीसरातील काही गावांचा विज पुरवठा सुरु झाला आहे. काल राञी उशीरापर्यंत तामसवाडी विज केंद्रावरुनही विज पुरवठा जोडण्याचा प्रयत्न केला होता माञ विज पुरवठा सुरळीत झाला नाही . विज वितरणचे कर्मचार्यांसह आज भङगाव येथील बाळद रस्त्यावरील २ विज पोल उभे करुन काम पुर्ण झाल्याची माहीती भडगाव विजवितरणचे उपअभियंता अजय धामोरे यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना दिली. पाचोरा ३३ केव्ही मेनलाईनने भडगाव येथुन वडजी विज उपकेंद्र व लोण पिराचे विज उपकेंद्र आदि ठिकाणी विज पुरवठा करण्यात येतो. माञ भडगाव बाळद रस्तालगत २ विजेचे पोल पाउसात जमिनीवर आडवे पडल्याने वडजी, लोणपिराचेसह अनेक गावांचा विज पुरवठा बंद होत गावे काल अंधारात बुडाली होती. भडगाव परीसरात काल सायंकाळनंतरही राञी उशीरापर्यंत पाउस सुरु होता. त्यामुळे विज पुरवठा विज वितरणला जोडण्याचा ञासाचा ठरला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.