सलग नवव्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : इंधनाच्या दरातील दैनंदिन वाढ सुरूच आहे. आज सलग नव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार आज पेट्रोलच्या दरात ४८ पैशांची, तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे गेल्या ९ दिवसांत पेट्रोल ४.३८ रुपयांनी महागले आहे. तर डिझेलच्या किमती ४.३९ रुपये प्रती लीटरने वाढल्या आहेत.

मुंबईत पेट्रोलचे दर ८३ रूपयांच्या पुढे गेले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर ८३.१७ रूपये प्रती लीटर आणि डिझेलचे दर ७३.२१ रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत.

तर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.२६ रूपये प्रती लीटर तर डिझेलचे दर ७४.६२ रूपये प्रती लीटर इतके झाले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ७९.९६ रूपये प्रती लीटर आणि ७२.६९ रूपये, तर कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ७८.१० रूपये प्रती लीटर आणि ७०.३३ रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत.

तब्बल ८३ दिवसांनंतर मागील आठवड्यात रविवारी लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पहिल्यांदा पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली होती. तेव्हापासून इंधन दरवाढ सुरूच आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांचे दर कोसळत असताना मधल्या काळात सरकारने इंधनाच्या किंमती गोठवल्या होत्या. पण आता हे दर वाढू लागल्यानंतर सरकारने या किंमती आता नेहमीसारख्या दैनंदिन स्वरूपात जाहीर करण्याचे धोरण अवलंबले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.