चितोडे वाणी समाजात आदर्श विवाह संपन्न

0

मोठ्या भावाने लावले लग्न

फक्त पंधराच नातेवाईक उपस्थित

पुणे – चितोडे वाणी समाजात आज ११ रोजी एक आदर्श विवाह संपन्न झाला. या विवाहाला फक्त १५ समाजबांधव उपस्थित होते.


भुसावळ येथील पद्मजा आणि रत्नाकर राजाराम चितोडे यांचे कनिष्ठ सुपुत्र हरीष यांचा विवाह नशिराबाद येथील श्रीमती कल्पना आणि कै.अनिल वासुदेव वाणी यांची कनिष्ठ सुकन्या,चि. सौ. कां. धनश्री हिचेशी अत्यंत साध्या पद्धतीत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मर्यादित म्हणजे फक्त १५ व्यक्तींच्या उपस्थितीत आज ११-जुन-२०२० गुरुवार रोजी पुणे येथे संपन्न झाला.
विशेष म्हणजे नवरदेव हरीश चे आई वडील या विवाह सोहळ्याला उपस्थित नव्हते. शासन निर्णयामुळे वयाच्या कारणामुळे त्यांना भुसावळ शहरातच थांबावे लागले.
दरम्यान त्यांचा मोठा मुलगा जळगाव येथील विनायक अट्रावलकर यांचे जावई वैभव रत्नाकर चितोडे आणि अमिता वैभव चितोडे यांनी विवाह लावला.

दोन्ही परिवाराचे समाजात सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.