गुजरातमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का!

0

गांधीनगर: राज्यसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला गुजरातमध्ये धक्क्यावर धक्के बसत आहेत.  मोरबी विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार ब्रिजेश मेरजा यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. विधानसभेचे सदस्यत्व सोडण्यापूर्वी ब्रिजेश मेरजा यांनीही कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी मेरजा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. गेल्या तीन दिवसांत राजीनामा देणारे ते कॉंग्रेसचे तिसरे आमदार आहेत, त्याआधी कॉंग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी गुरुवारी राजीनामा सादर केला.

राज्यसभेच्या चार जागांसाठी १९ जून रोजी निवडणुका होणार आहेत. आज राजीनामा देणारे ब्रिजेश मेरजा यांनी मोरबी जागेवरुन निवडणूक जिंकली. अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी गुरुवारी राजीनामा सादर केला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोडवाडिया म्हणाले की, भाजप काँग्रेसच्या आमदारा फोडण्यासाठी  पैशांसह धमकीचा वापर करत आहे.

 या आमदारांनी दिला आहे राजीनामा 

राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून कॉंग्रेस डगमगू लागली आहे. काँग्रेसच्या एक-एक करून आमदारांनी पक्ष सोडला. गड्डा येथील प्रवीण मारू, लिंबडी येथील सोमा पटेल, अब्दासा येथील प्रद्युम्नसिंग जडेजा, धारी येथील जे.व्ही. काकडिया आणि दांग येथील मंगल गावित यांनी राजीनामा सादर केला होता. काल गुरुवारी म्हणजेच वडोदराच्या करजण सीटवरील आमदार अक्षय पटेल आणि वलसाडच्या कपर्डा सीटचे आमदार जितू यांनी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांना राजीनामा सादर केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.