आरोग्य मंत्र्यांचे ऑपरेशन यशस्वी होईल का?

0

एक महिन्यापूर्वी जळगाव शहर कोरोना मुक्तीकडे तर अमळनेर तालुका वगळता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. गेल्या महिन्यभरात कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९०९ वर पोहोचली आणि मृत्यूची संख्या १०७ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असली तरी वाढता मृत्यूचा दर ही त्यापेक्षा जास्त चिंतेची बाब बनली. जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट असलेले अमळनेर आता आटोक्यात आले असतांना भुसावळ, जळगाव आणि भडगाव हे तालुका आता कोरोना हॉटस्पॉट बनले आहेत. जळगाव आणि भुसावळची रुग्णसंख्या २०० च्या वर गेली असून भडगाव तालुका शंभरीकडे वाटचाल करतोय जिल्ह्याची कोरोना बाबतीत भयावह स्थिती लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अखेर बुधवारी जळगाव दौरा केला. जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या आणि वाढत्या मृत्यूच्या संख्येबाबत विविध बैठकांमध्ये उहापोह झाला. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स यांचे समवेत विचार विनिमय केले. लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मंत्री महोदयांना अनेक सूचनांना तोंड द्यावे लागले. विरोधी पक्षाचेवतीने अधिकारी – अधिकाऱ्याला समन्वयाचा अभाव, कोविड रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये समन्वय नसणे, कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅबच्या अहवालास विलंब होणे, अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयच नाही. विरोधी पक्षाचे कोणीही ऐकत नाही. कोविड मध्ये सावळा – गोंधळ त्यामुळे रुग्ण संख्या आणि मृत्यू संख्या वाढीची कारणे पुढे करीत आरोप केले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा होणारा फैलाव आणि वाढती मृत्यूसंख्या याबाबत प्रशासनावर ताशेरे ओढले.

जळगाव जिल्ह्याचे जळगाव शहर आणि ग्रामीण भागापैकी मनपा आयुक्तांवर शहराची तर सिव्हील सर्जनकडे ल्ह्याची जबाबदारी सोपवली.

शहराच्या रु्णसंख्येबरोबर मृत्यू संख्येवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपा आयुक्त कुलकर्णी हे जबाबदार असतील आणि जिल्ह्यासाठी सिव्हील सर्जन जबाबदार धरले जाईल. जळगावच्या कोविड रुग्णालयात योग्य उपचार होत नाही. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे राजेश

टोपे यांनी मान्य केले. त्यासाठी कोविड रुग्णालयाकडे टोपेंनी आपला मोर्चा वळविला. आपल्या दौर्यांतील एकूण सव्वातासभर इतका वेळ टोपे यांनी कोविड रुग्णालयात घालवला तेथे २०० बेडच्या कोविड रुग्णालयासाठी १९९ डॉक्टर्स म्हणजे एका बेडसाठी एक डॉक्टर उपलब्ध असताना रुग्णांवर योग्य उपचार का होत नाही? योग्य उपचार होत असेल तर मृत्यूची संख्या वाढण्याचे कारण काय? असा सवाल करून वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि त्यांच्या टीमची चांगलीच धुलाई केली.

अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या डॉक्टरांची संख्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या यादीत तफावत आढळली येथे अधिष्ठाता डॉ.

खैरै यांचा खोटारडेपणा स्पष्ट झाला. तसाच प्रकार रुग्णांच्या वाढत्या मृत्यू संख्येबाबतही झाला रुग्णांना अनेक व्याधी असल्यामुळे मृत्यूची संख्या वाढतेय असे आरोग्य मंत्र्यांना डॉक्टरांकडून सांगताच व्याधी आहेत म्हणून मरू द्यायचे का? असा प्रति सवाल टोपे यांनी केल्याने डॉक्टरांची बोलती बंद झाली. जिल्हा कोविड रुग्णालयातील योग्य समन्वयासाठी प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे गोषित केले. आता प्रशासक म्हणून डॉ.

बी.एन. पाटील हे ३ ते ४ तास कोविड रुग्णालयात ठाण मांडून बसतील आणि योग्य त्या सूचना देऊन रुग्णांवर योग्य उपचार होण्याचे दृष्टीने ते दखल घेतील. त्यानंतर जि.प. चे दोन उप मुख्य कार्यकारी अधिकारी हे रुग्णालयात स्वतः पीपीई कीट घालून रुग्णांवर डॉक्टरांकडून योग्य उपचार होतात की नाही हे पहाण्याची जबाबदारी मंत्री महोदयांनी सोपविली त्यामुळे कोविड रुग्णालयातील प्रशासनाचे चांगलेच ऑपरेशन मंत्र्यांनी केली असल्यामुळे आता कोविड रुग्णालया संदर्भातील तक्रारी कमी होती अशी अपेक्षा करायला हरकत नाही. रुग्णालयाची दोन वेळा स्वच्छता झाली पाहिजे तसेच रुग्णांना वेळेवर जेवण मिळाले पाहिजे याही सूचना टोपे यांनी केल्या.

जळगाव कोरोना रुग्णाच्या स्वॅबची चाचणी करणारी लॅब आतापर्यंत नव्हती तोपर्यंत स्वॅबचा अहवाल येण्यास विलंब होत होता तो समजू शकतो तथापि आता जळगावच्या वैद्यकिय महाविद्यालयात स्वॅब चाचणी करणारी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरु झाली असताना स्वबचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होण्याचे कारण काय? असा प्रश्न आरोग्य मंत्री यांनी केला. यापुढे एखाद्या रुग्णाचे स्वब घेतल्यानंतर २४ तासाच्या आत त्याचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे. उशिर झाल्यास त्याला डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाईल असा इशाराही टोपे यांनी दिल्यामुळे आता त्याची अंमलबजावणी कशी होतेय हे दिसून येईल. तसेच कोविड रुग्णालयात जे डॉक्टर काम करीत नसतील तर त्यांना कामावरून काढून टाकण्याचे अधिकार मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर फिल्डवर घरी जाऊन नागरिकांची तपासणी बिनचूक व्हावी अशा सुचनाही राजेश टोपे यांनी केल्या. नागरिक तपासणीसाठी सहकार्य करीत नाहीत असा विरोधी सूर डॉक्टरांनी काढला पण त्यांचे म्हणणे ऐकले नाही. एकंदरित आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाचे चांगलेच ऑपरेशन केले. बघू या त्याचा परिणाम कसा होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.