‘वंचित’च्या या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

मुंबई: महाराष्ट्र किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका असतानाच राजकीय वादळही पाहायला मिळाले. आज अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार  बळीराम सिरस्कार आणि  हरीदास भदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला खिंडार पडलं आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. सुनील तटकरेही उपस्थित होते.

माजी आमदार हरीदास भदे हे १९९२ साली जि. प. सदस्य व अकोला पंचायत समितीचे सभापती होते. २००३ साली ते पुन्हा जि. प. सदस्य झाले तर २००४ मध्ये अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार झाले. सन २००९ मध्ये हा मतदारसंघ अकोला पूर्व म्हणून ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघातून ते विधानसभेवर दुसऱ्यांदा आमदार झाले. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव म्हणून ते कार्यरत होते.

तसेच माजी आमदार बळीराम सिरस्कार हे २००१ मध्ये अकोला जि. प. अध्यक्ष होते. त्यानंतर २००३ मध्ये ते दुसऱ्यांदा जि. प. सदस्य झाले. अनुक्रमे २००९ आणि २०१४ मध्ये ते बाळापूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.