जिल्हाधिकाऱ्यांची फिल्डवरील भेट ठरते परिणामकारक !

0

जळगाव जिल्ह्याला कोरोना विषाणूंनी घेरले आहे. अवघ्या 20 दिवसात रुग्ण संख्या ६७६ वर पोहोचलीय. वाढती रुग्ण संख्या ही जशी चिंतेची बाब आहे.  त्यापेक्षा जास्त चिंता वाढत्या दराची आहे. कारण जळगावातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर भारतातील मृत्यूदरापेक्षा चौपट इतक्या आहे. या वाढत्या मृत्यूदरावर नियंत्रण आपणे हे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रमुख जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे हे प्रयत्नशील आहेत.जि

ल्ह्यातीलअविनाश ढाकणे हे सुरुवातीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन होण्याच्या दृष्टीने संबंधितांना मार्गदर्शन तसेच सूचना देतात. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यात याबाबतीत योग्य समन्वय असल्याने जिल्ह्याच्या सीमा सील करणे, बाधितांचा एरिया सील करणे, रुग्ण आढळलेला परिसर निजुंर्तकीकरण करणे, सर्वेक्षण करणे, रुग्णाच्या उपचारासाठी कोवीड रुग्णालयाची निर्मिती करणे, त्यासाठी वेगवेगळ्या जागा अधीगृहीत करणे, सामाजिक संघटनाना प्रोत्साहन देऊन त्यांचे सहकार्य घेणे. याबाबी अत्यंत चांगल्या पद्धतीने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हे करीत आहे. जिल्हाभरात ज्या-ज्या ठिकाणी रुग्ण आढळताहेत त्या-त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्याची माहिती घेऊन योग्य त्या सूचना दिल्याने स्थानिक पातळीवर कारवाईला वेग येतोय.

सध्या जळगाव शहरात आणि जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या तसेच वाढता मृत्यूदर याबाबतीत सर्वांचिच चिंता वाढवली आहे. जळगाव येथील शासकीय कोवीड रुग्णालयाला रात्री जिल्हाधिकार्‍यांनी अचानक भेट दिली.सेन्ट्रल ऑक्सीजन सिस्टिम कोवीड रुगलयात नसल्याने ऑक्सीजनचे सिलेंडर हाताळण्यात तसेच रुग्णापर्यंत नेण्यासाठी लागणारा कालावधी रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. म्हणून कोवीड रुग्णालयात लवकर सेन्ट्रल ऑक्सीजन सिस्टिम कार्यान्वीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या. रात्री कोवीड रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर, परिचारिकांशी त्यांनी संवाद साधला. परंतू कोवीड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी सुद्धा त्यांना संवाद साधून त्यांची विचारपूस केली. सावदा येथील कुलसूमबाई मंगल कार्यालय अधीगृहित करुन येथे कोवीड सेन्ट्रल सुरु केलेले आहे. दोन दिवसांपूर्वी या कोवीड सेन्ट्ररला प्रत्यक्ष जिल्हाधिकार्‍यांनी भेट दिली तिथे उपचार घेत असले त्या रुग्णांची विचार पूस केली. त्यांना कसल्या अडचणी येतात का? याबाबत माहिती घेतली. एकंदरीत व जिल्हाधिकार्‍यांचा फिल्डवरचा वावर प्रशासनाला पारदर्शक आणि गतीमानता आणण्यास मदत होते.

अमळनेर जेव्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते तेव्हा तर अमळनेर हे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष्य केले होते. त्यांचा परिणाम अमळनेर तालुका रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश केलाय. अमळनेर तालुक्यात वापरण्यात आलेली थ्री लेअर पद्धती आता सर्वत्र वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगिगतले आणि त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा मृत्यूदर जादा असण्याची विविध कारणे काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही सूज्ञ तज्ञ नागरिकांकडून काही सूचना केल्या आहेत. त्यासंदर्भात कोवीड रुगलयात ज्या सोयी-सुविधा झाल्या पाहिजेत त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव हे एक कारण सांगितले जाते. त्यात समन्वय घडवून आणावे. कोरोनाच्या भितीपोटी आजार लापवून ठेवणे आणि ऐन शेवटच्या क्षणी अ‍ॅडमिट होणे हे टाळले पाहिजे. त्यासाठी जनजागृती हाच एकमेव उपाय आहे. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे जास्तीत जास्त चांगल्या रितीनं अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न व्हावा. परंतू नागरिकांनी सुद्धा सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्यांच्या सहकार्यावरच फार काही अवलंबून असते.

कोवीड रुग्णालयाच्या अलिकडे तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारी दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. तो रोखण्यात येत असलेले अपलेले अपयश तसेच कोरोना रुग्णाचा मृत्यूदर नियंत्रण आणण्याचे हे स्थानिक पातळीवरचेच अपयश आहे असे काही सूज्ञांचे म्हणणे आहे. त्याबाबतीतही योग्य ती पावले उचचली गेली पाहिजेत.

लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चांगली कामगिरी केली. अनेक गुन्हेगार प्रवृत्तींना चांगलेच ठेचून काढले आहे. अवैध दारुची विक्री करणार्‍यांना तर चांगलेच वठणीवर आणले आहे. त्यात त्यांनी कसलाही मुलाहिजा केला नाही. हे विशेष.
जनतेचे सहकार्य घेऊन त्यांच्यावर कायद्याची सक्ती करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाला जनतेने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

चांगभलं-

धों. ज.गुरव

Leave A Reply

Your email address will not be published.