वडगांव निम शिवारातील गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त

0

पहूर, ता . जामनेर । प्रतिनिधी
पोलीस अधिक्षक डॉ . पंजाबराव उगले , अप्पर पोलीस अधीक्षक गोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलिसांनी वडगांव निमशिवारात गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला .
याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेशसिंह परदेशी , पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे ,पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, चालक संजय सोनवणे, होमगार्ड नंदू जाधव यांच्या पथकाने भल्या पहाटे वडगाव निम शिवारातील धरणाजवळ नबीशान बाई जाफर तडवी हिचे 3 टाकी 200 लिटर कच्चामाल व नाल्या शेजारी आमिर फकिरा तडवी रा . जामठी यांचे 12 टाकी 200 लिटर प्रमाणे गावठी हातभट्टीची दारू धाड टाकून नष्ट केली .दोन्ही मिळून सुमारे 75,500 रुपयांचा गावठी हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करून अड्डा उद्धवस्त केला . दोन्ही आरोपी विरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून नाईक चौधरी व सुरवाडे हे तपास करीत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.