ऑनलाइन सहजयोग ध्यानाला विश्वविक्रम प्रदान

0

पारोळा । प्रतिनिधी
श्री माताजी निर्मला देवी यांनी सुरू केलेल्या कुंडलिनी जागरणावर आधारित सहज योग ध्यानाला ५० वर्षे नुकतीच पूर्ण झाली होती आणि संपूर्ण विश्वाचे चक्र अचानक थांबले आणि सर्व साधक आपापल्या घरातच बंदिवासात गेले. १२० हून अधिक देशांमधील सहयोग ध्यान केंद्रांमध्ये या साथीच्या रोगामुळे सामूहिक साप्ताहिक ध्यानकेंद्र स्थगित करावे लागले.
अशा विचित्र आणि अनिश्चित परिस्थितीत, ऑनलाइन ध्यान एक वरदानच ठरले आणि यात बघता बघता सुमारे ८०-८५ देशांमधील लाखो सहजयोगी साधक आणि नवीन साधकही उत्स्फूर्त पणे, पुण्यातील श्री माताजींचे जगप्रसिद्ध निवासस्थान “प्रतिष्ठान” येथून प्रसारित होत असलेल्या ऑनलाइन कार्यक्रमांमधून फेसबुक आणि युट्यूबद्वारे द्वारे जुळले गेले.
याच अनुषंगाने, गेल्या ६० दिवसात लॉक डाऊन च्या कालावधीत ऑनलाइन ध्यान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ९ मे २०२० रोजी जगभरातील सहज योग कुटूंबाला ३ विश्व विक्रमांनी गौरविण्यात आले.
ग्लोबल रेकॉर्डस अँड रिसर्च फाउंडेशन (जी.आर.आर.एफ.) ही विश्वविक्रम आणि पुरस्कारांसाठी एक जागतिक दर्जाची संस्था आहे, ज्याने २२ मार्च ते ५ मे दरम्यानच्या ऑनलाइन सहज योग ध्यान कार्यक्रमांना ३ प्रतिष्ठित विश्व विक्रम पुरस्कार प्रदान केले.
१- ग्लोबल रेकॉर्ड – सर्वात मोठ्या सामूहिकतेद्वारे ऑनलाइन ध्यान.
२- आशिया पॅसिफिक रेकॉर्ड – आशिया खंडातील सर्वात जास्त लोकां द्वारे केले गेलेले ऑनलाइन ध्यान.
३- राष्ट्रीय रेकॉर्ड – सर्वात मोठे दररोज केले जाणारे ऑनलाइन ध्यान.
सहजा योगाला ५० वर्षे पूर्ण झाल्या बद्दल सुवर्ण महोत्सवी उत्सव, युट्यूब आणि फेसबुक द्वारे खासकरुन नवीन साधकांसाठी सामूहिक ध्यान आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम २२ मार्च २०२० ते ५ मे २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
श्री माताजी आणि सहज योगाबद्दल
श्री माताजी निर्मला देवी यांनी ५ मे १९७० रोजी कुंडलिनी जागृतीद्वारे आत्मसाक्षात्कार नामक ध्यान प्रक्रिया शोधून काढली आणि या सामूहिक आत्मसाक्षात्कार तंत्रातून जगभरातील साधकांना आध्यात्मिक चमत्कार दाखविला, ज्यासाठी प्राचीन काळातील ऋषी मुनी अनेक वर्षे तपश्चर्या करूनही त्यांना ही शक्ती मिळवायचे ती सामूहिक स्तरावर सुलभ झाली . सहजयोग ध्यानातून कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याने जगभरातील कोट्यावधी लोकांचे जीवन बदलले.
कलियुगातील षडरिपु मुळे ग्रस्त असलेल्या सांसारिक माणसाचे वर्तन, शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती या दिशेने कुंडलिनी शक्तीद्वारे मिळालेला आत्मसाक्षात्कार एक वरदान असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्याप्रमाणे हरिण आपल्या नाभीमध्ये असलेल्या कस्तूरीच्या सुगंधाच्या शोधात इकडे तिकडे भटकत राहतो, त्याचप्रमाणे, जन्मापासून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी, मंदिर, मशिदी, गुरुद्वारा, चर्च इत्यादी ठिकाणी, दिव्यतेच्या शोधातील एखादी व्यक्ती सहजपणे श्रीमाताजींच्या कृपेने कुंडलिनी जागृतीचा अविश्वसनीय प्रसाद प्राप्त करतो.
सर्व मानवांसाठी, वैज्ञानिक, डॉक्टर, कॉर्पोरेट, शिक्षक, कलाकार, कामगार, राजकारणी, वेद ज्ञानी, लहान, मोठे, रंग, जात प्रजाती, श्रीमंत, गरीब, देश आणि परदेशात अश्या सर्व मर्यादा तोडत सहयोग ध्यान जगभर पसरला. म्हणूनच श्री माताजींनी त्याचे नाव “वैश्विक धर्म- सर्व धर्मांचे सार ” ठेवले आहे .

निर्विचार समाधी सारखी कठीण मानलेली स्थिती सहज योग ध्यान करून सामान्य जीवनशैली बनली. मन बुध्दी आत्म्याशी संबंधित चक्र आणि नाड्यांमधील स्मुक्ष ज्ञान आणि अध्यात्मातील गहन सर्वात गहन रहस्ये देखील श्री माताजींनी संपूर्ण जगासमोर उलगडून ठेवली.
प्राचीन युगात, कुंडलिनी शास्त्र कठीण मानले जात होते, श्री माताजींनी या कलीयुगातील गृहस्थाश्रमात राहून प्रत्येकाला हे ज्ञान उपलब्ध करून दिले आणि म्हणूनच आज जगातील १२० देशांमध्ये लाखो लोक या पद्धतीने ध्यानधारणा करून आपले जीवन व्यतीत करीत आहेत.
लॉक डाऊन दरम्यान सहज योग ध्यान करण्यासाठी गेल्या ६० दिवसात दैनंदिन सुमारे ४ लाख साधकांनी पुणे प्रतिष्ठानच्या यूट्यूब वाहिनीला ९० देशातून भेट दिली. ३ मे २०२० रोजी ३ लाखाहून अधिक नवीन साधकांनी ऑनलाइन आत्म-साक्षात्कार चा लाभ घेतला होता.
ऑनलाइन ध्यान सत्र
१) सहज योगाचे सकाळ संध्याकाळचे ध्यान निःशुल्क दररोज (भारतीय वेळेनुसार) पहाटे ५.३० आणि संध्याकाळी ७ वाजता केले जाते.
२) नवीन साधकांसाठी विनामूल्य ध्यान कार्यक्रमः
लॉकडाउन कालावधीत प्रतिकारशक्ती सुधारण्यासह, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी दररोज संध्याकाळी ५ वाजता युट्यूब चॅनेल -Learning Sahajayoga, फेसबुक पेज- Learning Sahajayoga आणि मिक्सएलआर ऑनलाईन रेडिओद्वारे ९० मिनिटांच्या सत्रादरम्यान ध्यान आणि इतर ध्यान संबंधित क्रिया केल्या जातात. गेल्या ६० दिवसांत, अनेक नवीन साधकांनी तंबाखू आणि धूम्रपान करण्यासारख्या वाईट सवयीपासून मुक्ती मिळवली. काही लोक त्यांच्या औदासिन्य आणि मानसिक तणावातून बाहेर आले. झोप न येण्याची समस्याही दूर झाली.
सामान्य जनतेच्या सोयीसाठी, सहज योगाने राष्ट्रीय स्तरावर 1800 30 700 800 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. या नंबरवर कॉल करून सहज योगाशी संबंधित सर्व माहिती घरबसल्या विनामूल्य मिळू शकते. ह्या सुविधेचा फायदा सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र सहजयोग राज्य समन्वयक श्री स्वप्निल धायडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.