लॉकडाऊनचा सदुपयोग ; वाद्य संगीतातील तीच सरगम…

0

कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे . आपल्या देशात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे . जनतेने काळजी म्हणून घरात रहावेव असे आवाहन सरकार कानोकपाळी करत आहे . याच लॉकडाऊनचा काळ काही लोक आपला छंद जोपासण्यासाठी सत्कारणी लावत आहेत.
आयटी क्षेत्रात काम करणारा मयूर कोळी या तरुणानेही हा कालावधी आपल्या आवडत्या छंदासाठी अर्पण केला आहे .
आपल्या कामाच्या निमित्ताने घरापासून दूर हैद्राबाद येथे वास्तव्यास आहे . कामाच्या व्यापाने आपल्या आवडत्या छंदापासून मयूर दूर लोटला गेला . तबला वादन करणे हा मयूरचा छंद . त्यासाठी त्याला तबला वादन शिकायचे होते . लॉकडाऊन मुळे जळगाव येथे घरी परतल्यावर काही काम नसल्यामुळे त्याने घरातच युट्युब च्या सहाय्याने तबला वादनाचे धडे घेतले . आता तो सर्व ताल व लय सांभाळत उत्कृष्ट तबला वादन करतो .
कामाच्या व्यापामुळे कधी हा छंद जोपासायला वेळ मिळालाच नाही , पण या कोरोना आणि लॉकडाऊन मुळे हे शक्य झाले . आणि वेळेचाही सदुपयोग झाला असे मयूर चे म्हणणे आहे.

प्रतिक जोशी, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.