कोरोनाला हरवण्यासाठी भारत वापरणार नवा फॉर्म्युला

0

नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधिताचा आकडा काही केल्या कमी होत नाहीय. जगभरातीय सर्व देश करत कोरोनावर लस शोधण्याचं काम करीत असताना आता भारत कोरोनाला हरवण्यासाठी एक नवा फॉर्म्युला वापरत आहे. नामांकित फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क यांनी असा दावा केला आहे की, भारतीय नियामक मंडळाचे महासंचालक डीसीजीआय यांनी नवीन उपचार आणि औषधांसाठी आवश्यक मान्यता दिली आहे.

क्लिनिकल चाचणीसोबत पुढे जाण्यासाठी आता दोन 2 अँटी-व्हायरल औषधांचे मिश्रण भारतात वापरले जाणार आहे. याच फॅव्हिपायरवीर आणि अम्फिनोव्हिर यांचे मिश्रण समाविष्ट केले जाईल. ही क्लिनिकल चाचणी देशभरातील रूग्णालयात दाखल झालेल्या कोव्हिड-19 रुग्णांवर केली जाईल आणि या उपचारादरम्यान सुरक्षा आणि प्रभाविपणा यांचे मूल्यांकन केलं जाईल. याआधी चीन, हॉंगकॉंग आणि बांगलादेशमध्ये औषधांचे मिश्रण वापरून कोरोना रुग्ण बरे केले होते.

असा असेल प्लॅन

यासाठी भारतातील कोव्हिड रूग्ण दोन गटात विभागले जातील, ज्यामध्ये एका गटाला दोन अँटी-व्हायरल औषध तयार केलेल्या औषधाचे मिश्रण दिले जाईल, तर दुसर्‍या गटाला फक्त फॅव्हीपिरवीर दिलं जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.