पिलखोडचे प्रा. उपकेंद्र बनले कुत्र्यांचे निवास्थान ; ग्रामस्थांमध्ये संताप

0

पिलखोड, ता.चाळीसगाव (वार्ताहर) : शासनामार्फत लाखो रुपये खर्च करून प्राथमिक उपकेंद्राच्या इमारतीतील बनवण्यात आले आहे.त्यापैकी पिलखोड उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र नेहमी बंद असते. सध्याही हे उपकेंद्र मात्र कुत्र्यांचे निवासस्थान झाले आहे.येथे कर्मचारी नसून मात्र कुत्रे बिंदास आराम करीत आहेत. एक मलेरिया डॉ.असून त्याच्या कडे 7 गावांचा चार्ज आहे.एक एन एम आहेत त्या कधीतरी चमकतात त्यामुळे हे हे उपकेंद्र असून नसल्यासारखे आहे.तसेच गरोदर महिलांचे रात्री बे रात्री मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. पर्ययी चाळीसगाव दवाखान्यात महिलांना घेऊन जावे लागते. व नाहक 1000 रुपयेचा भुदंड सुसंवा लागतो त्या मुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.यांची वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.

वैद्यकीय डॉक्टर व एन एमकायमस्वरूपी नेमणुक करा

चाळीसगाव मालेगाव रस्त्यावरील पिलखोड गांव 15000 हजार लोकवस्तीचे गाव असून गावाला लागून 10 ते 12 खेड्ये आहेत. सध्या राज्यात व जिल्ह्यात तसेच गिरणा पट्ट्यात अदृश्य कोरोना रोगाचा प्रादुर्भाव जोरात वाढत आहे. गावात कुठल्याही परिसरात आरोग्य अधिकारी चा सर्वे नाही. गावात काय परिस्थिती आहे यांचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून वरील उपकेंद्रात त्वरित एक डॉक्टर व एक एन यांची कायम स्वरूपी नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायत तर्फे होत आहे तसा ग्रामपंचायतीचा ठराव संबंधित अधिकारी यांना देण्यात येत आहे. शिवाय चाळीसगाव मालेगाव रस्ता मोठा रहदारी झाला असून या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात.काही जखमी लोकांना चाळीसगाव जाण्यासाठी वेळ वेळ खर्चीक पडतो. त्यामुळे काही पेशंट रस्त्यावर दगावतात पिलखोड येथे डॉक्टर उपकेंद्रात असल्यावर उपचाराची मोठी सोय व गावातील परिसरातील सामान्य नागरिक व गोरगरीबाची सोय होणार आहे. तरी या मागणीची त्वरित दखल खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांना संबंधित वरिष्ठांनी घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.