जळगाव जिल्ह्यातील 139 रुग्णांनी ‘कोरोना’चे युद्ध जिंकले !

0

चांगभलं : धों.ज. गुरव, मो. 9158301793

 

  •  कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेला अमळनेर तालुका ऑरेंज झोनमध्ये
  • कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना टाळ्या वाजवून दिला डिस्चार्ज
  • खाकीतील चार कोरोना योद्धांचा अधीक्षकांकडून सन्मान
  • कोवीड योद्धांच्या परिश्रमाला मिळतेय आशादायक यश

जळगाव जिल्ह्याला कोरोनाच्या विषाणूंनी चहुबाजूने एकीकडे घेरले असल्या मुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 381 इतकी म्हणजे साडेतीन शतके पार केले आहे. दुसरीकडे दिलासादायक चित्र सुद्धा समोर दिसत आहेत.आज पर्यंत जिल्ह्याभरातील एकूण 139 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना जळगाव येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय कोवीण रुग्णालयातर्फे तसे जिल्हाभरातील विविध कोविड सेंटरमधून मान्यवरांच्या उपस्थितीत डिस्चर्ज देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले. कोरोना य आजारावर रुग्णांनी विजय मिळविला असला तरी त्यांच्या विजयामध्ये कोविड रुग्णालयात तसेच केविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार करणार्‍या सर्व डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगारांबरोबरच इतर विविध क्षेत्रातील कोरोना योद्धांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांनी लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी घेतलेले परिश्रम याचा उल्लेख मोलाचा आहेत.
जळगाव जिल्ह्यातील 381 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 139 रुग्ण कोरोना मुक्त झाले म्हणजे कोरोनातून बरे होण्याची टक्केवारी 34 टक्के इतकी येते ही टक्केवारी समाधानकारक म्हणावी लागेल. जिल्ह्यात अमळनेर तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी 106 रुग्ण एकट्या अमळनेर तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ जळगाव 71 आणि भुसावळची रुग्णसंख्या 60 इतकी आहे. पाचोरा 23, चोपडा 20, भडगाव 45, धरणगाव 1, यावल 7, मलकापूर 1, जामडी ता. चाळीसगाव 1, रावेर 2, जामनेर 1 अशी रुग्णांची संख्या आहे.
105 रुग्णसंख्या असलेल्या अमळनेर  तालुक्याने  कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्या संदर्भात कमालीचे यश मिळविले आहे. जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या 139 रुग्णांपैकी एकट्या अमळनेर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 90 रुग्णांचा समावेश आहे. आता अमळनेर तालुक्याचे फक्त 15 रुग्ण उपचार घेत आहेत आणि तेही बरे होऊन घरी जातील यात शंका नाही. म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अमळनेर तालुक्याची आघाडी होती आणि आता कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णातही आघाडीवर आहे.
अमळनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना तेथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. खैरे, सिव्हील सर्जन डॅ. एन.एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यामधील प्रशसकीय अधिकारी, पोलिस अधीक्षकारी स्थानिक सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी यांची झालेली एकजूट आणि घेतलेली मेहनत फळाला आली. लॉकडाऊन व्यतिरिक्त जनता कर्फ्यु तेथील जनतेने स्वत:वर लादून घेतला. तालुक्याची सीमाबंदी केली क्वॉरंटाईन एरिया सील केले ेले. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केल्यामुळे आज कोरोनाचा हॉटस्पॉट असलेला अमळनेर तालुका ऑरेंज झोनमध्ये आलाय. लवकरच तो ग्रीन झोनमध्येही येऊ शकतो.

जे अमळनेर तालुक्यात शक्य झाली तीच पद्धत इतर ठिकाणीही वापरण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास यश येईल. आता तर जळगावातच कोरोना रुग्णांच्या स्वॅबचा चाचणी अहवाल जळगावातच उपलब्ध होत आहे. जो कोरोना चाचणी अहवाल मिळायला विलंब होत होता तो आता होणार नाही. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीवर नियंत्रण आणणे सुद्धा शक्य होईल. अमळनेर तालुक्यातील जनतेनी कोरोनावर विजय मिळविण्यासाठी जसे सहकार्य केले तसेच सहकार्य जिल्हाभरातून मिळाले तर जळगाव जिल्हासुद्धा ऑरेंज झोनमध्ये येऊ शकतो हे खुद्द सिव्हील सर्जन डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले आहे.

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  स्वत: खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. त्यासाठी घरातच सुरक्षित राहावे. अनावश्यक गर्दी टाळावी, मास्कचा व सॅनिटायझरचा उपयोग करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी जनतेचीच आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.