१ जूनपासून १६ रेल्वेधावणार, आरक्षण सुरू

0

भुसावळ | प्रतिनिधी
गेल्या २२ मार्चपासून बंद असलेली प्रवासी रेल्वे सेवा १ जूनपासून पुन्हा सुरु होणार आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे सुरू केल्या जाणाऱ्या २०० पैकी १६ रेल्वे गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत. या गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण गुरुवारी (दि.२१) सकाळी १० वाजेपासून सुरू होत आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक भागात नागरिक अडकून पडल्यामुळे १ जून पासून देशभरात २०० रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यापैकी १६ गाड्या मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणार आहेत. यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. या गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून केवळ ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडक्या उघडल्या जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या गाड्यांचा समावेश
मुंबई, पुणे, अहमदाबाद येथे या गाड्या धावतील. यात कुशीनगर एक्सप्रेस, पवन, कामयानी, महानगरी, पुष्पक एक्स्प्रेस, मंगला, सचखंड, हावडा मेल व्हाया नागपूर, अहमदाबाद हावडा एक्सप्रेस, जनता एक्सप्रेस, पाटलीपुत्र, ताप्ती गंगा एक्सप्रेस, गोरखपूर कुर्ला सुपरफास्ट, पुणे दानापूर एक्सप्रेस, गुवाहाटी एक्सप्रेस आणि गोवा एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.