चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर! वाचा, काय सुरु, काय बंद राहणार?

1

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रकोप काही केल्या कमी होत नाहीय. राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बाधितांचा आकडा पहाता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविले आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन ४.० ची नियमावली जाहीर केली. हे नियम २२ मे पासून ३१ मेपर्यंत लागू राहतील.

 वाचा काय सुरु होणार आणि काय नाही

राज्याची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी विभागणी-
रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका येणार आहेत. तर महाराष्ट्राचा उर्वरित भाग बिगर रेड झोन क्षेत्रात येईल.

एमएमआर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या महापालिका – मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर

कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी होणार असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद असतील.

सर्वच झोनमध्ये पुढील गोष्टींना बंदी कायम-
1. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
2. मेट्रोसेवा बंद राहणार
3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार.
5. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थिएटर, बार बंद राहणार
6. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
7. सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
8. सर्व खासगी कार्यालये बंदच राहणार, कर्मचाऱ्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असल्याची खातरजमा मालकांनी करावी.
9. सलून, ब्युटी पार्लर आणि सौंदर्यप्रसाधन निगडीत सेवा

रात्रीची संचारबंदी-
– संध्याकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान सर्व सेवा बंद राहणार
– अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बाहेर पडायला मज्जाव
– 65 वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती तसेच 10 वर्षांखालील मुलांनी घरीच थांबावे. केवळ वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडावे.

रेड झोनमध्ये काय सुरु राहणार?-
– अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने
– इतर दुकानांना परवानगी देण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार
– स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारुची दुकाने सुरु करता येणार, दारुची होम डिलिव्हरी करता येणार
– हॉटेल आणि रेस्टॉरंट यांची होम डिलिव्हरी
– बँक, कुरिअर, पोस्ट सेवा
– टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार
– चारचाकी वाहनामध्ये 1 + 2
– दुचाकीवर केवळ एकालाच परवानगी
– रेड झोनमध्ये उघडण्यास बंदी असलेली दुकाने, मॉल, आस्थापना केवळ स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती किंवा पावसाळ्याच्या पूर्वीच्या कामांसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उघडता येणार, मात्र निर्मिती किंवा व्यावसायिक वापरास सक्त मनाई
– दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरु करण्याची परवानगी
– विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी
–  आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स डिलिव्हरी
– केवळ विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस डेपोमधील
उपहारगृहे, तसेच पोलीस, आरोग्य अधिकारी, सरकारी अधिकारी, पर्यटकांसह अडकलेले मजूर, क्वारंटाईन भागातील उपहारगृहे सुरु

कार्यालयीन अटी

सर्व खासगी कार्यालये बंदच राहणार
वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन
सरकारी कार्यालयात किमान कर्मचारी बोलवावेत, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक
हात धुणे, सॅनिटायझर याची व्यवस्था करावी
दोन कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावे
कर्मचाऱ्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असल्याची खातरजमा मालकांनी करावी

रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन
रेड झोनमधील कंटेन्मेंट झोनचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना कंटेन्मेंट झोनविषयी निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहेत.

कंटेन्मेंट झोनमध्ये एखादी वसाहत, झोपडपट्टी, इमारत, मोहल्ला, इमारतींचा संकुल, गल्ली, वॉर्ड, पोलीस स्टेशनचा भाग, गाव किंवा गावाचा भाग यांचा समावेश होऊ शकतो. त्यापेक्षा मोठा विभाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यापूर्वी (संपूर्ण तालुका किंवा महापालिका क्षेत्र) मुख्य सचिवांशी चर्चा करणे बंधनकारक असणार आहे.

1 Comment
  1. Arvind Motiramani says

    Corona se bachne ka ek upaye
    Ye ho sakta hai
    Garam pani Subah Sham pina
    Teen char baar din me garam
    Chaye tea pine se
    India me Sankraman kam ho sakta

Your email address will not be published.