दिलासादायक ! करोनावरील लस शोधल्याचा चिनी संशोधकांचा दावा

0

बीजिंग  : जगभरात ‘कोरोना’वर लस शोधण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असताना चीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. करोनावरील लस शोधल्याचा दावा चीनमधील शास्त्रज्ञांनी केला. याबाबतचे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे.  चीनच्या पेकिंग विद्यापीठाच्या शासत्रज्ञांनी या लशीचा वापर करून 60 जणांच्या रक्तातील विषाणू अँटीबॉडिजच्या सहाय्याने नाहीशा केल्या आहेत.

विद्यापिठाच्या बिजींग ऍडव्हान्स इनोव्हेशन सेंटर फॉर जेनोमिक्‍सचे संचालक सनी झेई यांनी या औषधांचे जनावरांमध्ये उत्तम परिणाम दिसून आल्याचे सांगितले.  आम्ही संक्रमित उंदराला या अँटीबॉडीजचे इंजेक्‍शन दिले. त्यावेळी विषाणूंची क्षमता अडीच हजारने कमी झाली. याचाच अर्थ हे औषध परिणामकारक आहे, असे झेई म्हणाले.

अँटीबॉडीजचा वापर बाधिताला बरे करू शकतो. तसेच उपचाराचा कालावधी कमी करू शकतो, असे या संशोधन पथकाच्या शोधनिबंधात म्हटले आहे. तो सायंटिफिक जर्नल सेल या नियतकालिकांत प्रकाशित करण्यात आला आहे.  झेई म्हणाले, या लशीच्या मनावावरील चाचण्या सुरू आहेत. शास्त्रज्ञांना जगभर वेगाने वाढत असणाऱ्या करोनाच्या साथीवर हा रामबाण उपाय असल्याचा विश्‍वास वाटत आहे. करोनाच्या साथीला आटोक्‍यात आणण्यासाठी औषध शोधण्याचे जागतीक पातळीवर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.