जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात पाचोरा येथे बैठक

0
पाचोरा ️ प्रतिनिधी
पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी लवकरात – लवकर हमीभावाने जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे यासंदर्भात दि.१६ मे २०२० रोजी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकारी, जळगाव तथा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कापूस खरेदी करण्यात यावा याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दि. १८ मे रोजी सभापती सतीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह व तहसिलदार कैलास चावडे, तालुका उपनिबंधक नामदेव सूर्यवंशी, बाजार समिती सचिव बी. बी. बोरुडे आणि संबंधित अधिकारी व सर्व जिनिंग मालकांसमवेत बैठक पार पडली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे यांनी सांगितले की, बाजार समितीत आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त नाव नोंदणी झालेली आहे. तसेच जवळ आलेला खरीप हंगाम बघता शेतकऱ्यांना लागवडीच्या पूर्वतयारीसाठी तसेच नवीन बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैशांची अडचण असुन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असल्यामुळे सर्व जिनिंग मालकांनी आपल्या जिनिंग लवकरात लवकर सुरू करून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा असे आवाहन केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी यावेळी सर्व जिनिंग मालकांना भारतीय कपास निगम लिमिटेड (सी. सी. आय.) व पणन महासंघ कडून येणाऱ्या अडचणी यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर बोलून अडचणी सोडविण्यास व  मजूर उपलब्धतेसाठी मदतीचे आश्वासित केले. तसेच अशा कोरोना (कोविड – १९) महामारीमुळे उद्भवलेल्या अशा संकटकालीन परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कठीण काळात मदतीचे आवाहन त्यांनी जिनिंग मालकांना केले. यावेळी पाचोरा चे तहसिलदार कैलास चावडे यांनी देखील मजुरांकरिता बसेस व प्रवास परवाना देण्यासंदर्भात व शासनाकडून सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे सांगितले. यासोबतच तालुका उपनिबंधक नामदेव सूर्यवंशी यांनी देखील सर्व अडचणी समजून घेऊन शासन पातळीवर मांडून जिनिंग मालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे तसेच मे. भवानी शंकर जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी (भडगाव), चुनीलाल
– मोतीलाल जिनिंग – प्रेसिंग फॅक्टरी (वरखेडी), पी. सी. के. कॉटन जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी (आंबे वडगाव), अंकित जिनिंग अॅण्ड प्रेसिंग फॅक्टरी (बांबरुड), लक्ष्मीनारायण जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी (नगरदेवळा),भारत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी (पाचोरा), गजानन जिनिंग – प्रेसिंग फॅक्टरी (पाचोरा), श्री श्रीनिवास जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी (पाचोरा), चे  जिनिंग मालक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.