होम क्वांरटाईन व्यक्ती बाहेर  फिरताना दिसल्यास गुन्हे

0
जिल्ह्यात जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. असे नागरिक बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश गोरक्ष गाडीलकर, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा इंन्सिडंन्ट कमांडर यांनी  संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. अशा नागरिकांची अचानक तपासणी करावी. जे नागरिक बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही श्री. गाडीलकर यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.