अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार बनले, विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली 

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अखेर आज आमदार बनलेघेतल. मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषदेच्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली.यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या.

अवघ्या 10 मिनिटात शपथविधीची प्रक्रियापार पडली. या शपथविधीनंतर राज्यातील राजकीय अस्थिरताही संपली आहे.विशेष म्हणजे आमदार म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार बनले. शिवाय ते कॅबिनेट मंत्रीही बनले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, राजेश राठोड या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली. तर भाजपकडून गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके रमेश कराड आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथग्रहण केली. भाजपचे गोपीचंद पडळकर हे शपथविधीसाठी धनगरी वेशात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.