रेल्वे गाड्या जून महिन्यातही बंदच !

0
भुसावळ (प्रतिनिधी )-
 रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार कोरोनाचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ३० जुन२०२० पर्यंत १२ वाजेपर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी गाड्या पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोणतीही प्रवासी गाडी प्रारंभीच्या स्थानकावरून धावणार नाही, जसे की प्रवासी गाडी, मेल एक्स्प्रेस, मेमो ट्रेन, सर्व ब्रांच लाइन , दुरंतो एक्सप्रेस, लोकल ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे,
*भुसावळ विभागातून कोणतीही प्रवासी गाडी धावणार नाहीत*
माल व पार्सल गाड्या फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठी कार्यरत असतील.
भुसावळ विभागातील सर्व स्थानकांची आरक्षण केंद्रे, अनारक्षित तिकीट केंद्रे, पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. हे कार्यालय सुरू झाल्यानंतर परतावा आरक्षण कार्यालयामार्फत होईल आणि हा परतावा पूर्ण दिला जाईल. प्रवाश्यांनी प्रवासाच्या तारखेपासून 6 महिन्या पर्यंत रद्द केलेल्या गाड्यांची तिकिटे रद्द करण्यासाठी आरक्षण कार्यालय मध्ये आरक्षित तिकिटे सादर करु शकतात . आरक्षण कार्यालय सुरू झाले की प्रवाशांनी तिकीट रद्द करण्याची घाई करू नये कारण त्यामुळे गर्दी होऊ शकते आणि त्याचा आरोग्य वर परिणाम होऊ शकतो . आरक्षण चा परतावा हा सुरक्षित आहे आणि तो 6 महिन्या पर्यंत मिळणार आहे .
ऑनलाइन तिकीट धारकां चे तिकीट हे ऑनलाइन तिकीट रद्द करावे लागेल आणि परतावा हा बँक खात्यात जमा होईल .
*महत्वाची माहिती*
रेल्वे बोर्डाने हे स्पष्ट केले आहे की कोरोनाच्या दुष्परिणामांमुळे भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे रद्द झाली आहे आणि प्रवाशांना कोणत्याही परिस्थितीत रेल्वे स्थानक परिसरात प्रवेश करण्याची परवानगी नाही.
श्रमिक स्पेशल ट्रेन ही विशेष ट्रेन राज्य सरकारच्या विनंतीवरून विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींसाठीच चालविली जाईल पण फक्त राज्य सरकारच्या विनंतीवरून ज्या प्रवाश्याला प्रवास करायचा असेल त्यांनी केवळ  राज्य सरकारशी संपर्क साधावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.