…नाहीतर १०५ आमदारांचे ५० व्हायला वेळ लागणार नाही ; एकनाथराव खडसे

0

जळगाव :- विधान परिषद निवडणुकीसाठी उमेवारांची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांची नाराज दडून राहिली नाही. नव्यानं सामाजिक समीकरणाची मांडणी करण्याचं काम केलं आहे, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. भाजपाच्या या स्पष्टीकरणाचा समाचार घेत पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर इशारा दिला आहे.

भाजपा सामाजिक समीकरणाच्या मांडणीविषयी बोलताना खडसे म्हणाले, “नव्यानं मांडणी करत असताना प्रामाणिकपणे मांडणी करावी. वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीनं उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचं वाईट वाटतं. यांच्या सामाजिक समीकरणामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे बसत नव्हते का? जुन्या माणसांचा जेवढा जनाधार आज आहे, तेवढा नवीन माणसांचा जनाधार आहे का?  विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही,” असा घणाघाती हल्ला एकनाथ खडसे यांनी भाजपा राज्यातील नेत्यांवर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.