जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोनाची लागण ; पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित

0

जळगाव : जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री या अधिकाऱ्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात ते कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे जिल्हा प्रशासनासह संपुर्ण आरोग्य यंत्रणा हादरली आहे.  संबंधीत अधिकाऱ्याच्या दालनातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळाल्यानंतर कर्मचारी भयभीत झाले आहेत.

विशेष म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी कोरोना च्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते. या
बैठकीला देखील ते उपस्थित होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्‍वारंटाईन करण्यात येणार आहे. शिवाय त्यांच्या बंगल्यावर आठ ते दहा जण कामास येत असल्याने त्यांचा देखील संपर्क असून त्या सर्वांना क्‍वारंटाईन करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 180 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तेवीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.