कोरोना जामनेरकरांचे दार ठोठवतोय!

0
जामनेर (प्रतिनिधी): – येथून अवघ्या 32 किमी अंतरावर भुसावळ तसेच पाचोरा येथे कोरोना रुग्ण आढळुन आल्याने .तसेच यापुढे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता तालुक्यात कोरोना दक्षता केंद्र मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उभारण्यात आले आहे.
आज रोजी श्री.सुरेशचंद्र धारिवाल पॉलिटेक्निक कॉलेज पळासखेडा ,जामनेर येथे 100 बेडस ची व्यवस्था पुर्ण करण्यात आली.यामध्ये संक्रमित व असंक्रमिक स्त्री व पुरुष विभाग, बाह्यरुग्ण विभाग, नोंदणी  कक्ष व औषधी कक्ष स्थापन करण्यात आले आहे.आठ तासाच्या रोटेशन मध्ये 3 परिचारिका, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व एक रुग्णवाहिका तसेच मदतीला नगरपालिका चे स्वछता कर्मचारी यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, तहसीलदार अरुण शेवाळे, नोडल अधिकारी डॉ.विनय सोनवणे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.भविष्यात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू शकते म्हणुन प्रत्येक नागरिकांनी काटेकोर पणे लॉक डाऊन चे पालन करावे. असे आवाहन  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण व तहसीलदार अरुण शेवाळे यांनी नागरिकांना केले.तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोविड हॉस्पिटल म्हणुन जी.एम.हॉस्पिटल ची सुद्धा पाहणी करून याबाबत डॉ.प्रशांत भोंडे यांना काही सुचना करून लवकरात लवकर कामकाज पुर्ण करण्याबाबत सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.