कोरोनाला रोखण्यासाठी भडगावात जनता कर्फ्यू

0
भडगाव – प्रतिनिधी
कोरोनाचा रूग्ण हा पाचोषऱ्यात सापडला. त्यामुळे भडगाव शहराच्या वेशीवर आलेला कोरोनाना आळा घालण्यासाठी शहरवासीयांनी स्वयंस्फुर्तीने शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तहसिलदार माधुरी आंधळे यांना निवेदन ही देण्यात आले. त्यामुळे स्वयंस्फुर्तीने शहरातील मेडीकल, दवाखाने व फक्त दुध विक्रीचे दुकान सोडुन सर्व दुकान पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्धार केला.
पाचोरा शहरात काल कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण आढल्याने भडगाव शहरवासीयांमधे धडकी भरली आहे. त्यामुळे 12 किमी नजिकच आलेल्या कोरोना ची साखळी खंडित करण्यासाठी शहरातील जागृत नागरिक, व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव यांनी शहरात स्वयंस्फुर्तीने तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत तहसीलदार माधुरी आंधळे यांना शहरवासीयांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, मुख्याधिकारी विकास नवाळे उपस्थित होते.
तिन दिवस शहर पुर्णपणे बंद
भडगाव शहर 29 एप्रिल ते 1 मे पर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यात फक्त  दवाखाने, ठराविक मेडीकल व फक्त दुध विक्रीचे दुकान सुरू राहणार आहेत.इतर सर्व दुकान ही पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने शहरवासीयांनी घेतला. नागरीकांनी वैद्यकीय कारणाशिवाय घराच्या बाहेर न पडण्याचा निर्धार केला आहे. आज पाचोरा शहारात कोरोना रूग्ण सापडला आहे. त्यामुळे आपले शहर कोरोनामुक्त राहावे म्हणून शहरवासीयांनी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.  यावेळी नगराध्यक्ष अतुल पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रदिपराव पवार, माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, नगरसेवक प्रशांत पवार, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मनोहर चौधरी, स्विकृत नगरसेवक डाॅ.प्रमोद पाटील,  शिवसेना अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाध्यक्ष इमरान अली सय्यद, मेडीकल असोसिएशन सुरेश भंडारी,  व्यापारी असोसिएशन चे प्रकाश भंडारी, मुकुंदा महाजन, विजय महाजन, संजय पाटील  पत्रकार संघाचे सुधाकर पाटील, संजय पवार,अशोक परदेशी आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.