पाचोरा नगरपालिकातर्फे तोंडावर मास्क न लावणार्‍याला पाचशे रुपयांचा दंड

0

पाचोरा (प्रतिनिधी) : सद्स्थितीत कोरोना या जीवघेण्या आजाराने जगभर थैमान घालत असुन या आजारा पासुन बचाव करण्यासाठी प्रशासनाने मास्क किंवा रुमाल वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. या सुचनेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तरी सुद्धा शहरात अनेक नागरिक हे मास्क किंवा रुमालचा वापर करत नसल्याने पाचोरा नगर पालिका प्रशासनाने दि. २० रोजी सकाळी शहरात रमेश येवले हा नागरिक तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावता आढळून आला.

याप्रकरणी नगर पालिका प्रशासनाकडुन रमेश येवले यांच्याकडून पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यावेळी पाचोरा नगरपालिका शोभा बाविस्कर यांनी सांगितले की, यापुढेही जे कोणी मास्क किंवा रुमाल न लावता फिरतांना आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.