जिल्हाबंदीचा आदेश मोडून मुंबई येथून आलेल्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

भडगाव (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र लॉक डाऊन आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांनी जिल्हा बंदीचा आदेश काढला असून या आदेशाला झुगारून भडगाव तालुक्यातील गुढे या गावी मुंबई हून आलेल्या तीन जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, कोरोणा च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन आहे. तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनी जिल्हा बंदीचा आदेश असताना कायदा झुगारून मुंबई येथून तीन जन भडगाव तालुक्यातील गुढे येथे अाले म्हणून फिर्यादी- पो. कॉ. एकनाथ पाटील-  भडगाव पोलिस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून आरोपी -१) नितीन भगवान मोरे (वय २८) रा.भांडुप पञ्चिम मुंबई. ह. मु.गुधे २) सुनील वसंत मोरे ( वय २०) धंदा ऊसतोड रा. त्रंबकेस्वर  ह. मु. गुढे   ३) गौतम आनंदा मोरे (वय२४) रा भांडुप पञ्चीम मुंबई ह. मू. गुढे या तिघांविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला भादवी कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन हे तिघेही मुंबई येथून बाहेर गावाहून दि.२० रोजी गुढे गावात घरी आले होते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या तिघांची तपासणी करण्यात आली तसेच त्यांना १४ दिवस होम कोरांटाईन केलेले होते. मात्र ते तिघेही जण घराबाहेर फिरत असताना मिळून आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नितीन सोनवणे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.