#Video : ४४ वर्षीय पोलिस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

0

इंदोर : देशात कोरोना बाधितांच्या संख्येत मृतांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दरम्यान, इंदूर येथील पोलीस स्टेशनचे पीआय देवेन्द्र कुमार चंद्रवंशी यांचे आज कोरोना प्रादुर्भाव झाल्यामुळे निधन झाले.  कोरोना पॉझिटिव्हनंतर त्यांच्यावर  अरविंद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांचा आज मृत्यू झाला आहे. २००७ झाली पोलीस विभागात कार्यरत झालेले देवेंद्र हे शजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

कोरोना पॉझिटिव रुग्णांची ने आण करण्यासाठी ते सक्रिय होते

कोरोना प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना दवाखान्यात नेत असताना त्यांना सुद्धा कोरोना प्रादुर्भाव झाला कोरोना संसर्ग झालेला इंदोर शहरातील हे पहिले पोलीस अधिकारी आहे. पोलिस अधिकाऱ्याची ड्युटी बसवत असताना देवेंद्रकुमार चंद्रवंशी शहीद झाले. त्यामुळे पोलिस विभागाने पी पी इ घालून शासकीय इतमामात गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.