कोरोना : जळगाव जिल्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह

2

जळगाव | प्रतिनिधी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आल्याचे जाणवत असताना जळगावात आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली आहे. सदर महिला अमळनेर येथील असून शुक्रवारी रूग्णालयात दाखल झाल्यानंतर आज अहवाल प्राप्त झाला असून हा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे दोन पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले होते. यात एकाचा मृत्यू झाला तर सर्वात पहिला पॉझिटीव्ह रूग्णाचे दोन दिवसांपुर्वी प्राप्त रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. यानंतर त्या रूग्णास डिस्चार्ज देण्यात आला होता. यामुळे जळगाव कोरोना मुक्‍त झाल्याचे बोलले जात होते. परंतु, 60 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य प्रशासन हादरले आहे. 

महिला कोणाच्या संपर्कात? 
जिल्ह्यातील अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेला त्रास जाणवू लागल्याने ती महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात म्हणजेच कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्या महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे रिपोर्ट आज रात्री उशिरा प्राप्त झाले असून, रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. महिला अमळनेर येथील राहणारी असून सदर महिला कोणाच्या संपर्कात आली; याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. 

2 Comments
  1. Yogeshwar S. Wani says

    This is Good Work At lockdown period

    1. Lokshahi editorial says

      THANKS

Leave A Reply

Your email address will not be published.