दहीगाव ग्रा.पं.कडून अंगणवाडी, आशा वर्करांना 1 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम

0

दहिगाव, ता.यावल : येथील ग्रामपंचायतकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी ,अगणवाडी सेविका , मदतनीस, आशा वर्कर या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन पर भत्ता म्हणून प्रत्येकी १०००रू प्रमाणे शासनाच्या परीपत्रकानुसार वितरीत करण्यात आला. वितरीत करतांना सरपंच साजिया सत्तार तडवी व उपसरपंच देवीदास धांगो पाटील यांनी त्यांना ही रक्कम चेक द्वारे दिली. ही रक्कम त्यांना ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग योजनेतुन देण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. ग्रामीण पातळीवर या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबवणे, आरोग्याची काळजी घेणे, आवश्यकतेनुसार सर्वेक्षण करणे इत्यादी कामे जिवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेऊन करत आहेत. हे कर्मचारी जोखीम पत्करुन ही कामं करत असल्याने, त्यांना येथील ग्रामपंचायत कडून एक हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.