गिरड येथील पेट्रोल पंपाविरूध्द गुन्हा

0
भडगाव – प्रतिनिधी
तालुक्यातील गिरड येथील पेट्रोल पंपावर  दोन  ट्रॅक्टरांमध्ये ठरून दिलेल्या वेळ नंतर डिझेल भरतांना आढळले म्हणून भडगाव पोलिस स्टेशनला पुरवठा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, सध्या कोरोनाचे थैमान सुरू असून ज्या ठिकाणी गर्दी होते असे अत्यावश्यक ठिकाणी वेळेचे बंधन दिलेले आहे तसेच पास धारकांना पेट्रोल व डिझेल वेळेत टाकू शकता. तालुक्यातील गिरड येथील पेट्रोल पंपावर आज भडगाव महसूल विभागाचे पथक सुरेश सीताराम पाटील मंडळ अधिकारी गिरड, शरद कौतिक पारधी तलाठी गिरड, किशोर महाले पुरवठा अधिकारी भडगाव, हे पथक तपासणी साठी गेले असता जय मल्हार किसान सेवा पेट्रोल पंपावर दुपारी एक वाजता दोन ट्रॅक्टर क्र. एम. एच. १९ बी. जी. १०९४ व एम. एच. १९ ए. एन. ४९४६ हे दोन ट्रॅक्टर मध्ये डिझेल भरताना आढळले तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून किशोर रमेश महाले पुरवठा अधिकारी भडगाव यांच्या फिर्यादीवरून जय मल्हार किसान सेवा पेट्रोल पंप यांच्या विरूद्ध भाग -६ गु. र. न १०३ /२०२० भा. द. वी. कलम १८८ जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ रास्टिय आपत्ती व्यस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १९८९ चे कलम ३   प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.