शेंदुर्णी नगरपंचायतीकडुन निर्जंतुकीकरण फवारणी

0
शेंदुर्णी नगरपंचायतीकडुन निर्जंतुकीकरण
शेंदुर्णी
सध्या वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी शेंदुर्णीत नगरपंचायतीच्या वतीने विविध खबरदारीचा उपाययोजना केल्या जात आहे. यात शहराची स्वच्छता, नागरिकांच्या आरोग्याची काळजी,जनजागृती यावर भर देण्यात ये असुन आता सध्या युद्धपातळीवर सोडियम हायप्लोराईड ची शहरात वेळोवेळी फवारणी करण्यात येत आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ.विजया खलसे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगराध्यक्षा सौ.चंदाबाई अग्रवाल, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अमृत खलसे,गोविंद अग्रवाल, सर्व कर्मचारी आदींचा यात सहभाग असुन नागरिकांनी घरात बसुन आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या शहरासाठी नगरपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.