किराणा, भाजीपाला विक्रेत्या कडून सर्वसामान्यांची लूटमार

0

भडगाव | प्रतिनिधी सागर महाजन

देशातील लॉकडाउन परिस्थिती ने सामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध होत नसताना जीवनावश्यक वस्तूंच्या ही भाववाढी ने सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या त्रास सहन करावे लागत आहे.  शहरासह तालुक्यात किराणा मालाच्या भावात जास्त प्रमाणात वाढल्याने सामन्यांच्या खिष्याला भार परवडणारे नाही. परंतु गरजा या जीवनावश्यक असल्याने त्याचा न परवडणारा भार ही सोसावा लागत असल्याने गरीब व सामान्य मजूर वर्गाच्या जीवनमनावर परिणाम कारक ठरणारा आहे.

बाजारात 20 ते 25 रुपये किलो ने विक्री होनारा भाजीपाला ५० ते १०० रुपये किलो ने होत आहे. शेंगदाणे ९० रुपये किलो चे ११० ते १३० रुपये, तेल ९५ रुपये चे १०७ ते ११० रुपये किलो, साखर ३८ रुपये ची ४४ रुपये ते ४६ रुपये किलो , दूध शहरातील काही भागात ५० रुपये लिटर चे ६० रुपये लिटर लॉकडाउन जीवनावश्यक वस्तू साठी नसतांना मागणी व पुरवठा समतोल असतांना भाव वाढ कशी ?
किराणा दुकानदाराची माल खरेदी तपासण्यात यावी अव्वाच्यासव्वा भावाने सामान्य नागरिकांची आर्थिक लूटमार होत असून तरी प्रशासनाने या व्यावसायिकांचे खरेदी पावत्या तपासून वाढीव भावाने विक्री करणाऱ्यानावर कार्यवाही करावी अशी मागणी सूज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.