शेतकर्याचा नाद कुणी करायचा नाही

0

 भङगाव | प्रतिनिधी  सागर महाजन

पेट्रोल पंपांवर मोटार सायकलींसह चारचाकी वाहने पेट्रोल भरण्यास नेहमी येतांना दिसतात. माञ सध्या कोरोना पाश्वभुमिवर संचार बंदीच्या काळात   तालुक्यातील वाडे येथुन जवळच असलेल्या बहाळ गुढे रस्त्यालगतच्या गायञी पेट्रोलीयम पंपावर बैलगाडीचालक शेतकर्याने   बैलगाडीतच चक्क मोटारसायकल ठेवुन पेट्रोल भरुन नेले. चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील हा शेतकरी वडजी गावाकडे बैलजोडी पोहच करुन परत येण्यासाठी बैलगाडीतच मोटार सायकल पेट्रोल भरुन घेउन गेला होता. या शेतकर्याचा अनोखा प्रकार दि.२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास वाडे येथुन जवळच असलेल्या बहाळ येथील पेट्रोल पंपावर पहायला मिळाला.

सध्या कोरोनाच्या पाश्वभुमिवर  सर्वञ जनजीवन विस्कळीत झाल्याचे चिञ आहे.  माञ शेतकर्याचा नाद कुणी करायचा नाही असेच या दृश्यावरुन म्हणता येईल. हा व्हिङीयोही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. या अनोख्या विनोदी प्रसंगाने नागरीकांमध्ये हास्याचे फवारे उडत असल्याचे दिसत आहे.त्यात पेट्रोल पंपांवर कुठे पेट्रोल मिळते तर कुठे मिळत नाही. पेट्रोल बाटलीत मिळत नाही.त्यात सध्या संचार बंदी लागु असल्याने नागरीकांना घराबाहेर निघु नये. घरातच थांबावे. कोरोना वर प्रतिबंध व्हावा. या उद्बेशाने शासनाने आदेश लागु केला आहे. त्यामुळे मोटार सायकलवाल्यांना खेडयापाङयात पेट्रोल मिळणे मुस्कील झाले आहे. अनेक वाहनधारकांना पेट्रोल मिळत नसल्याने वाहनांवर फिरता येत नाही.  त्यामुळे शेतकर्यांना काहींना शेतात मोटार सायकलींवर जाता येत नाही. पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल मिळत नाही. काही जण तुरळक मोटारसायकलींवर शेतात जातांनाही दिसतात. माञ या  चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील हा शेतकरी भङगाव तालुक्यातील वडजी गावाच्या मार्गाने बैलगाङी पोहचविण्यास बहाळ मार्गाने जात असल्याची माहीती पेट्रोल पंपावर उपस्थितांनी दिली.शेतकर्याचे मोटारसायकलीत पेट्रोलच संपले होते.  त्यात पेट्रोल पंपांवर बाटलीत पेट्रोल मिळत नाही.या शेतकर्याने बहाळ मार्गाने वङजी मार्गाला जातांना बहाळ गुढे रस्त्यालगत सुरेश कोंडू परदेशी वाडे ता भङगाव यांचा गायञी  पेट्रोलीयम पंपावर चक्क मोटारसायकल बैलगाङीवर ठेवुन आणली. व बैलगाङीवर चढुन चक्क मोटारसायलीत पेट्रोल टाकले.  यावेळी नागरीकांनी या शेतकर्याला हटकले असता हा विनोदाचा विषय समोर आला. अशा घटना या कोरोनाच्या संचारबंदीच्या काळात  घङत आहेत. माञ या आगळया वेगळया प्रकारच्या संकटकाळच्या  घटनेमुळे  हा विषय चर्चेचा ठरला आहे. हे अनोखे चिञ पाहुन उपस्थितांमध्ये एकच हसु पिकले. असा प्रसंग सध्या मोटार सायकलसह वाहनधारकांवर घडू शकतो. असे चिञ पहायला मिळाले. हा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. शेतकर्याचा नाद कुणी करायचा नाही अशा या  शेतकर्याच्या अनोखा प्रकाराने, विनोदी   प्रसंगाने नागरीकांमध्ये हास्याचे फवारे उडतांना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.