भुसावळात खाकीतील माणुसकी ; हातमजूरांना दिले जेवण

0

भुसावळ | प्रतिनिधी  

कोरोना प्रादर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी  सुरु आहे .याची सर्वात जास्त झळ बसते ती गरीब हातमजूर व पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भटकणाऱ्या जनतेला त्यांच्या हाताला काम नाही म्हणून दाम नाही अश्या अवस्थेत अडकलेले येथील पापानगर झोपडपट्टी व ईरानी झोपड़पट्टी भागात  खडका चौफुली भागातील उपाशी असलेल्या नागरिकांना बाजारपेठ पोलिस कर्मचारी यांनी जेवण दिले.  पेट्रोलिंग दरम्यान पोलिस हेड कॉन्स्टेबल सैय्यद अय्याज, पो कॉ. ईश्वर भालेराव , यांनी भुकेल्या महिला व त्यांचे लहान लहान मुलांना व्याकुळ झालेले बघितले .म्हणून या  भागातील  नागरिकांना पोटभर जेवण देवून तृप्त केले याकामी लकी गृपने सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.