नवापूर येथील इयत्ता चौथीचा कुशल माळी हा घरातील रिकामा वेळ घालतोय सामान्य ज्ञान व कोरोना जनजागृतीसाठी

0

भडगाव प्रतिनिधी

नवापूर येथील कुशलकुमार नितीनकुमार माळी( वाघळीकर) हा आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कोरोना आजारामुळे मिळालेल्या सुट्ट्यां मध्ये आपल्या ज्ञानात भर पडावी म्हणून विरंगुळ्यासाठी नवीन गाणे व सामान्य ज्ञानात भर पडावी म्हणून विविधांगी व्हिडिओ युट्युब ला डाऊनलोड करून एक आगळा-वेगळा अभिनव उपक्रम करीत आहे हा विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम करणारा तसेच सुट्टीच्या कालावधीत सुट्टीचा सकारात्मक उपयोग करणारा विद्यार्थी मानला जात आहे. ट्विटर युट्यूब फेसबुक व्हाट्सअप च्या माध्यमातून अनेक व्हिडिओ चला लाईक करून शेअर करण्याची तसेच आपल्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करण्याची मागणी या विद्यार्थ्या मार्फत होत असून सध्या घरात बसून रिकामा वेळ कसा घालवावा यासंदर्भात उत्तम अभिनव उपक्रम कुशल सध्या करीत असल्याचे वर्तविली जात आहे याच्या व्हिडिओचा अनेक लहान बालके व प्रौढ आनंद घेताना दिसत आहेत.एकीकडं व्हायरस ची भीती आणि त्यातल्या त्यात घरात बसून नवीन उपक्रम सुचने ही कौतुकास्पद बाब असल्याचे शिक्षकांनी सांगितले सदर व्हिडिओ करण्यासाठी त्याला मार्गदर्शन त्याचे वडील प्रा डॉ नितीनकुमार माळी व आई नीलिमा माळी यांच्या मार्गदर्शनाने सर्व व्हिडिओ केले जात आहे यापूर्वी माळी कुटुंबीयांनी दिनांक 22 मार्चला जनता कर्फ्यू च्या निमित्ताने घरात पथनाट्य सादर करून सोशल मीडिया या माध्यमातून कोरोना वायर संदर्भातील जनजागृती केली होती याबद्दल स्थानिक प्रशासनाने देखील अभिनंदन केले होते. दररोज जनरल नॉलेज आणि कोरुना आजाराविषयी जनजागृती या संदर्भातील किमान पाच मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.