भडगावात किराणा दुकानदारा वर गुन्हा दाखल

0


आदेशाचे उल्लंघन केल्याने कार्यवाही

भडगाव | प्रतिनिधी

सध्या कोरोना या रोगामुळे सर्व देश लॉक डाऊन आहे. या मध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व डाऊन आहे. या अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने जरी उघडी असली तरी त्यांना प्रशासनाने नियम व अटी लाऊन दिले असून शहरात एका किराणा दुकानदराने नियमाचे उल्लंघन केले म्हणून आज नगरपालिके कडून भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.२७ रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भडगाव शहरातील खोल गल्ली,बाजार चौक मधील जय भारत प्रोव्हिजन (किराणा) या मध्ये सध्या कोरोणा या अती सौंसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने दुकानात ग्राहकांची गर्दी केली होती. व दुकानात शानितायझेर ठेवले नव्हते. म्हणून दुकान मालकाने जळगाव जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या जमाव बंदीचे अटी व शर्ती चे या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून फिर्यादी- परमेश्वर भगवान तावडे, कार्यालईन अधीक्षक नगर परिषद भडगाव यांच्या फिर्यादी वरून दुकानाचे मालक रमनलाल छगनलाल जयस्वाल रा. खोल गल्ली आझाद चौक भडगाव यांच्या विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला भा.द.वी. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक प्रल्हाद शिंदे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.