अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानासमोर 1 मीटरच्या आखल्या चौकटी

0

भडगाव | प्रतिनिधी

कोरोणा चा प्रादुर्भाव वाढू नये व त्या संबधित खबरदारी घ्यावी म्हणून पोलिस, महसूल, नगरपालिका, वैद्यकिय प्रशासन हे विविध सूचना करत असून त्या बाबत खबरदारी घेणे ही नागरिकांची जबाबदारी असून आज भडगाव नगरपरिषदे कडून संपूर्ण शहरातील अत्यावशक सेवा देणाऱ्या दुकानासमोर एकत्र गर्दी होऊ नये म्हणून चुना टाकून चौकटी आखण्यात आल्या आहे.
या बाबत माहिती अशी की, कोरोणा विषाणू च्या पार्श्वभूमीवर आज भडगांव नगरपरिषद वतीनी अत्यवशक सेवा देणारे मेडिकल, किराणा, दूध डेअरी इ. दुकानावर माल घेण्यासाठी गर्दी होत असते म्हणून एक मीटर अंतरावर चुना आखून चौकटी तयार करण्यात आल्या आहे. दुकानदार व ग्राहक यांना एका वेळी जास्त गर्दी न करता या चौकटी तून एक एकाने माल घ्यावा व कोरोणा टाळावा असे सूचना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी आज दिल्या आहे. या वेळी छोटू वैद्य, जोसेफ मरसाळे, यांच्या सह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.